तरुण भारत लाईव्ह न्युज : अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा, लबाना-नायकवाडा समाजकुंभाचे भूमिपूजन १६ डिसेंबर रोजी पोहरागड गादीपती संत बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जामनेर तालुक्यातील गोंद्री येथील कुंभस्थळाच्या भूमीचा विधीवत मंत्र घोषात यज्ञ, आहुती देऊन भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यामुळे या कुंभाची बंजारा समाजाला ओढ लागली आहे.
या सोहळ्याला पाल आश्रमाचे गादीपती गोपाल चैतन्य महाराज, जनार्दन हरीजी महाराज, कुंभमेळा संचालन समिती अध्यक्ष श्यामचैतन्य महाराज, रामसिंग महाराज, सुरेश महाराज, चंद्रसिंग महाराज, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर नाईक यांचीही उपस्थिती होती.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री येणार
जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे २५ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा, लबाना-नायकवाडा समाजकुंभ होत आहे. या महाकुंभात राज्यातील मंत्र्यांसह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती निश्चित झाली आहे.
समाजकुंभाच्या भूमिपूजनाच्या दिव्य सोहळ्याला बंजारा समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येने गोद्रींत उपस्थिती दिली.
सकाळपासूनच मंत्रघोषात भूमिपूजन सोहळ्यास प्रारंभ झाला होता. दुपारपर्यंत सोहळ्यासाठीचे होमहवन, पूजा, यज्ञ आहुतीचा कार्यक्रम पार पडला. यज्ञ सोहळ्याला सकाळपासूनच बंधारा समाज बांधव सपत्निक पुजनासाठी बसले होत