गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीतील तेजी कमी झाली होती, पण आज दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जाणून घेऊयात काय आहेत आजचे दर.
जळगाव सराफ बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतीत किंचित प्रति तोळा १०० रुपयाची वाढ दिसून आली. दुसरीकडे चांदीच्या दरात १००० रुपयाची वाढ झाली आहे.
जळगाव सराफ बाजारात गुरुवार, ५ रोजी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोने ७०,४०३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ७६,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. चांदीचा एक किलोचा भाव ९२,००० रुपये इतका आहे.
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.