मुंबई । मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोनं 76600 रुपयांवर पोहोचले असून, एक किलो चांदीचे दर 89500 रुपयांवर आहेत.
दरम्यान, सकाळी 10 वाजता सोने 346 रुपयांनी वाढून 10 ग्रॅम सोन्याचे दर 76616 रुपयांवर पोहोचले. मंगळवारी सोन्याचे दर 76270 रुपयांवर होते.
चांदीच्या दरात देखील 322 रुपयांची वाढ झाली असून, एक किलो चांदी 89648 रुपयांवर पोहोचली आहे. मंगळवारच्या बाजार बंद झाल्यावर चांदीचे दर 89326 रुपयांवर होते.
दरवाढीची ही लाट बाजारात असतानाच, सराफ बाजारात सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर 78600 रुपयांवर आहेत. चांदीच्या दरात मात्र 500 रुपयांची वाढ झाली असून, 90500 रुपयांवर पोहोचली आहे.
गेल्या आठवड्यात सोने दरात घसरण झाली होती, परंतु यावेळी सोने दरात वाढ झाली आहे. जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रणव मेर म्हणाले की, सोने बाजारात ताज्या दरवाढीचा एक सकारात्मक संकेत आहे.