जळगाव । सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच आठवड्याच्या अखेरीस सोन्यासह चांदी दरात पुन्हा वाढ झालीय.
जळगावच्या सराफ बाजारात शनिवारी (२१ डिसेंबर) चांदीच्या दरात १,८०० रुपयांची मोठी वाढ झाली असून, ती ८८,००० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. तसेच, सोन्याच्या दरातही ६०० रुपयांची वाढ होऊन तो ७६,८०० रुपये प्रतितोळ्याच्या पातळीवर पोहोचला आहे.
गुरुवारी (१९ डिसेंबर) चांदीच्या दरात तब्बल ४,००० रुपयांची घसरण झाली होती. शुक्रवारी ती किंचित सुधारून ८६,२०० रुपये प्रतिकिलो झाली. मात्र, शनिवारी दराने उसळी घेतली.
सोन्याच्या किंमतीत थोडी वाढ झालेली असली तरीही सध्याचे उच्च दर पाहता, सोनं खरेदी करणं सर्वसामान्य खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर जात आहे.