आनंदाची बातमी : सोने झाले पुन्हा स्वस्त, काय आहे आजचा दर?

तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३। जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारात दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या (Gold Rate) किमतीने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. तर चांदीनेही मोठी उसळी घेतली. मात्र आज सकाळी नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येतेय. मात्र दुसरीकडे चांदी स्थिर आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
जळगाव सुवर्ण नगरीत सोमवारी सकाळी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजित 55,400 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तर तर 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 60,200 रुपये (विना जीएसटी) आहे. आठवड्याच्या शेवटची दिवशी सोन्याचा दर 60,700 रुपये इतका होता. म्हणजे सोने तब्बल 500 रुपयांनी घसरले आहे.

मात्र एप्रिल महिलाच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दरात 900 रुपयाची वाढ दिसून आलीय. गेल्या बुधवारी सोन्याच्या किमतीने आतापर्यंत रेकॉर्ड मोडला होता. त्यादिवशी सोन्याचा तोळ्याचा भाव 61 हजार रुपयांवर गेला होता. सोन्यात तेजी राहणार असून पुढील आठवड्यात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 63 हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

आज चांदीचा एक किलोचा भाव 74,600 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. दरम्यान, एप्रिल महिलाच्या पहिल्याच आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून आली असून त्यात तब्बल 2100 रुपयाने चांदी वधारली आहे. चांदीच्या दरात तेजी राहणार असून पुढील आठवड्यात चांदी 78 हजार रुपयांवर जाऊ शकते.

दरम्यान, अक्षय तृतीया सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. मात्र, अशातच सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांचे लक्ष्य या दोन्ही धातूंच्या हालचालीकडे राहणार आहे.