जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी भाववाढ झाली. सोने जीएसटीसह ९६ हजार ६१४ पोहोचले तर चांदी जीएसटीसह ९८ हजार ६७४ प्रति किलोवर पोहोचली आहे. परिणामी लग्नसराईसाठी सोने खरेदीच्या बेतात असलेल्या नागरिकांना सोन्याच्या चढ्या दराचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर सोन्यात पुन्हा मोठी वाढ झाली. १० व ११ एप्रिल रोजी सलग दोन दिवस प्रत्येकी १९०० रुपयांची वाढ होऊन ९३ हजार २०० रुपयांवर पोहोचलेल्या सोने भावात १२ एप्रिल रोजी ६०० रुपयांची वाढ होऊन, ते विनाजीएसटी ९३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर तर जीएसटीसह ९६,६१४ रुपयावर पोहोचले. तर चांदी जीएसटीसह ९८ हजार ६७४ प्रति किलोवर पोहोचली आहे.
पाच हजारापेक्षा जास्त वाढ
9 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 89,400 तर जीएसटी सह 92,080
10 एप्रिल रोजी सोन्याचे भाव 91,300 तर जीएसटी सह 94,040
11 एप्रिल रोजी सोन्याचे भाव 93,200 तर जीएसटीसह 95,996
12 एप्रिल रोजी सोन्याचे भाव 93,800 तर जीएसटी सह 96,614
ऐन लग्नसराईत भाव वाढल्याने सोने खरेदी करताना कुठेतरी तडजोड करावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून सोन्याचे भाव जरी वाढत असले तरी महाराष्ट्र सरकारने कुठेतरी सोन्यावरील जीएसटी व कस्टमड्युटी कमी करावी जेणेकरून सोन्याचे भाव कमी होतील व सर्वसामान्यांना परवडतील.
– देवेंद्र महाजन, ग्राहक
युएस व चायनाचा जो टेरिफोर सुरू आहे त्यामुळे मार्केट हे अनस्टेबल आहे त्याचा इफेक्ट हा सोन्यावर पडत आहे सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. कंट्रीज व सेंट्रल बँक यांची देखील इन्व्हेस्टमेंट यावर वाढत आहे. पुढे जाऊन इंटरेस्ट रेट कमी होण्याची शक्यता आहे आणि यांचा इम्पॅक्ट हा सोने मार्केटवर पडल्याने सोन्याचे भाव हे सातत्याने वाढत आहे. त्यामुळे ग्राहकी जरी असली तरी ग्राहक सोनं घेताना तळजळ करतात असताना दिसत आहे. मात्र काही ग्राहक भाव वाढल्याने ठेवणीतलं सोनं मोड करताना पण दिसत आहे. मात्र युएस आणि चायना मधील सुरू असलेले वर यावर काही तडजोड झाली तर भाव कमी होण्याची शक्यता आहे मात्र बाकी फॅक्टर जर बघितले तर सोनं हे पॉझिटिव्हिटी कडे घेऊन जात असल्याने या मंथ एंड पर्यंत 98 क्रॉस होण्याची शक्यता आहे.
– आकाश भंगाळे, सोने व्यापारी