Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या लग्नसराई सुरु असून सोन्याचे दर दररोज उच्चांकी गाठत आहे.अशातच शुक्रवारी जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर तब्बल १३०० रुपयांनी वाढले. या दरवाढीमुळे सोने पुन्हा ऐतिहासिक पातळीवर महागले आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही तेजी बघायला मिळत आहे. चांदीही आज १ हजार रुपयांनी महागली आहे. हि दरवाढ लक्षात घेता सोने आणि चांदीने सामान्य नागरिकांना चांगलाच घाम फोडल्याचे दिसून येत आहे.
जळगाव सराफ बाजारातील नवे दर
आज शुक्रवार रोजी जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर (विनाजीएसटी) ८८,९९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा दर (विनाजीएसटी) ८८,४१७ रुपये तर जीएसटीसह ९२ हजारावर पोहोचला. त्याचबरोबर, चांदीचा दर प्रति किलो ९९,७७५ रुपये झाला असून, जीएसटीसह हा दर १ लाख ५ हजार रुपये झाला आहे.
सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून, बाजारातील पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.