जळगाव : एकीकडे दसरा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून सोने खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे इस्त्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र असून गेल्या 36 तासात जळगाव सुवर्णनगरीत शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी पूर्वी 60000 रुपये असलेले आज 61000 हजार रुपये दरावर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा दसरा सण उत्साहात साजरा होणार असल्याची चिन्हे असून मात्र दुसरीकडे इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे आंतरराष्ट्रीय गणिते कोलमडली आहेत. त्याचा परिणाम सोने चांदीच्या दरावर देखील झाल्याचे पाहायला मिळतं आहे. एकीकडे दसऱ्याच्या सणामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे, त्याचा परिणाम सोन्याच्या दर वाढीत झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या छत्तीस तासात शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवस पूर्वी 6000 रुपये असलेले सोने आज 61000 हजार रुपये दरावर पोहोचले आहे. उद्या दसरा सण असून जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली असून उद्या आणखी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सोने विक्रेत्यांचे मत आहे.