---Advertisement---

Gold rate : सोने झाले लाखमोलाचे; जळगावच्या सुवर्णपेठेतही पार केला एक लाखांचा टप्पा

---Advertisement---

जळगाव : भारतीय संस्कृतीत ज्या पिवळ्या धातुला अनन्यसाधारण असे महत्व आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक घरात सोन्याला स्थान आहे. या सुवर्णाला लक्ष्मी समजून दसऱ्याला पूजा केली जाते. वैभवाचे प्रतीक म्हणजे सोने. म्हणूनच या पिवळ्या धातूचे दर सातत्याने वाढत गेले. सोमवारी देशाची राजधानी नवी दिल्ली आणि नाशिकमध्ये सराफा बाजारात सोन्याचा दर तोळ्याला लाखापेक्षा जास्त झाला. तर जळगावच्या सुवर्णपेठेतही सोमवारी दिवसभरात तीन वेळा वाढून एक लाखांचा टप्पा पार केला आहे. Jalgaon gold rate

डॉलरच्या कमकुवतपणामुळे मागणी वाढल्याने आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे अनिश्चितता वाढल्याने सोमवारी सोमवारी नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १०१७७० एवढा झाला होता. दिल्लीतही सोन्याचा भाव १ लाखापेक्षा जास्त झाला.

दिल्लीत सोन्याच्या किमतीत १,६५० रुपयांची वाढ झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम १ लाखाचा आकडा पार केला. सोमवारी ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९९,८०० रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी त्याची किंमत २० रुपयांनी घसरून ९८,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली, असे मत ऑल इंडिया सराफा असोसिएशनने व्यक्त केले आहे.

स्थानिक बाजारात ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत १,६०० रुपयांची वाढ होऊन तो ९९,३०० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला. गेल्या व्यवहार सत्रात, तो किंचित घसरणीसह ९७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.

या वर्षी आतापर्यंत, म्हणजेच २०२५ मध्ये, सोन्याच्या किमतीत २०,८५० रुपयांनी वाढ झाली आहे, म्हणजेच गेल्या वर्षी ३१ डिसेंबरच्या तुलनेत प्रति १० ग्रॅम सुमारे २६.४१ टक्के वाढ झाली आहे.

चांदीही वधारली

यात चांदीही मागे नाही, सोमवारी चांदीचा भावही ५०० रुपयांनी वाढून ९८,५०० रुपये प्रति किलो झाला. तर शुक्रवारी चांदीचा भाव ९८,००० रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला. सोन्याला नेहमीच अडचणीच्या वेळेचा आधार मानण्यात येतो.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment