नवी दिल्ली | 3 फेब्रुवारी 2025: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारी (अर्थसंकल्पाच्या दिवशी) 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव ₹84,500 च्या वर पोहोचला होता, मात्र आज (सोमवारी) तो ₹150 रुपयांनी घसरून ₹84,400 वर आला आहे. गुंतवणूकदारांसाठी हा काहीसा दिलासा मानला जात आहे, कारण सरकारने सोन्यावरील आयात शुल्कामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.
जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमधील बदल आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित मालमत्तेकडे ओढा यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर कपात आणि आर्थिक अनिश्चितता सुरूच राहिल्यास सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
देशभरातील सोने-चांदीचे दर
दिल्ली: 24 कॅरेट – ₹84,630 प्रति 10 ग्रॅम |
22 कॅरेट – ₹77,590 प्रति 10 ग्रॅम
मुंबई: 24 कॅरेट – ₹84,480 प्रति 10 ग्रॅम |
22 कॅरेट – ₹77,440 प्रति 10 ग्रॅम
चांदी: ₹99,400 प्रति किलो (शनिवारी ₹99,600 होती, ₹200 ची घसरण)