---Advertisement---

Jalgaon gold rate : सोनं चकाकलं! बारा तासात सातशे रुपयांनी वाढ, जाणून घ्या ताजे दर

by team
---Advertisement---


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर केलेल्या टेरीफ रेट धोरणाचा परिणाम म्हणून,गेल्या बारा तासात जळगाव सराफ बाजारात 700 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर 92000तर जी एस टी सह 94700 च्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या जगभरातील देशा बाबत टेरिफ रेट धोरणाचा परिणाम म्हणून ही वाढ झाल्याचं सांगितल जात आहे. येत्या काही तासात किंवा काही दिवसात ही वाढ अजूनही होण्याची शक्यता असून,सोन्याचे दर 95 ते 97 हजार रुपयांच्या वर पोहोचू शकतात असा अंदाज सोने व्यासायिक व्यक्त करत आहे.

सोन्याच्या या वाढत्या उच्चांकी दरात ग्राहक सोने खरेदी बाबत वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याच पाहायला मिळत आहे
तर काही ग्राहकांनी मात्र वाढलेले सोन्याचे दर आवाक्या बाहेर असल्याने ,खरेदी चे बजेट बिघडल्याने कमी प्रमाणात सोने खरेदी करावे लागत आहे व या वाढत्या भावामुळे आम्हीच स्वतः संभ्रमात असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या तीन महिन्यांत सोन्यानं मोठी भरारी घेतली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 76162 रुपये होता. हाच भाव 5 फेब्रुवारी 2025 रोजी प्रतितोळा 84207 रुपयांवर पोहोचलं होतं. 3 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोनं प्रतितोळा जी एस टी सह 94700 रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment