---Advertisement---

Gold Prices: सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर; एक तोळे सोन्यासाठी मोजावे लागणार एवढे पैसे

by team
---Advertisement---

Gold Prices: बुधवारी (२९ जानेवारी) रोजी  सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ दिसून आली.  एमसीएक्सवर सोन्याने त्याचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. डॉलरच्या निर्देशांकात झालेली घसरण आणि फेडकडून व्याजदरात कोणताही बदल न होण्याची शक्यता यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत.

 

गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत होती. मंगळवारी ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १६० रुपयांनी घसरून ८२,८४० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर सोमवारी तोच भाव  ८३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​होता. तथापि, मंगळवारी चांदी ९२,००० रुपये प्रति किलोवर स्थिर राहिली.
हेही वाचा : ऐकावं ते नवलचं! आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ, सोनोग्राफी रिपोर्टने डॉक्टरही थक्क
आज  दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीतही विक्रमी वाढ दिसून आली.  जानेवारी महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

देशातील फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या भावाने ट्रेडिंग सत्रात 80,413 रुपये प्रति दहा ग्रॅमची नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. तर आज सोने 80,325 रुपयांनी उघडले. एक दिवसापूर्वी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा भाव 80,289 रुपये होता. सकाळी सोन्याचा भाव 73 रुपयांच्या वाढीसह 80,362 रुपयांवर होता.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment