---Advertisement---

दिलासादायक ! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर

---Advertisement---

जळगाव : इराणच्या महत्त्वाच्या अणुप्रकल्पांवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून ड्रोनने केलेल्या युद्धानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. परिणामी सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम एक लाखाच्या पुढे गेले आहेत. अशात जळगाव सुवर्णपेठेत सोने दरात ४०० रुपयांची घसरण झाली असून, यामुळे ग्राहकांना काहीचा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात ४०० रुपयांची घसरण झाली असून, यामुले शुद्ध सोन्याचा दर ९९,६०० (जीएसटीसह १०२५८८) रुपयावर पोहोचला आहे. तर चांदी एक किलोचा दर १०६००० रुपये इतका आहे.

आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोललो तर, येथे २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९३,०४० रुपये दराने विकले जात आहे. कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्येही हाच दर आहे. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोने ९३,१९० रुपये दराने व्यवहार करत आहे.

कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत चांदीची किंमत समान आहे आणि ती १,०९,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तथापि, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये त्याची किंमत १,१९,८०० रुपये प्रति किलो आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment