Gold Price : राष्ट्रीय राजधानीतील सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने 630 रुपयांनी उसळी घेतली असून, 99.9 टक्के शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 82,700 रुपयांवर पोहोचले आहे. चांदीचाही भाव वाढून 94,000 रुपये प्रति किलो झाला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, जागतिक व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत आहेत. यामुळे सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 82,330 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता आहे त्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीला चालना मिळत आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की सोन्याचा भाव लवकरच 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमती आणि रुपयाचा डॉलरशी असलेला विनिमय दर यामुळे देशातील सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम होतो.
हेही वाचा : Bird flu: चिकन खात असला तर सावधान ! या जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा कहर
सहा महिन्यांचा रिटर्न
जुलै 2024 मध्ये सोन्याचा भाव सुमारे 82,000 रुपये होता. कस्टम ड्युटीत कपात झाल्यामुळे सोन्याचा भाव 76,000 रुपयांवर आला होता. मात्र सहा महिन्यांत तो पुन्हा जुन्या पातळीवर आला आहे. या कालावधीत सोन्याने जवळपास शून्य रिटर्न दिला आहे.
टीप : भारतातील सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, चलन विनिमय दर आणि देशांतर्गत मागणी-पुरवठ्याच्या परिस्थितीवर आधारित असतात.