जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या दराने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सराफा बाजारात प्रति तोळा १ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली असून, विनाजीएसटी सोन्याच्या दराने ९४ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी लग्नसराईसाठी सोने खरेदीच्या बेतात असलेल्या नागरिकांना मोठा झटका बसला आहे.
अमेरिका व चीनचा जो टेरिफोर सुरू असल्यामुळे मार्केट हे अनस्टेबल आहे. त्याचा इफेक्ट हा सोन्यावर पडत असून, सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. कंट्रीज व सेंट्रल बँक यांचीही इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर होत आहे. जळगावच्या सराफा बाजारात प्रति तोळा तब्बल १ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली असून, विनाजीएसटी सोन्याच्या दराने ९४ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, गेल्या शुक्रवारी सोने जीएसटीसह प्रतीतोळा ९६ हजार रुपयांपर्यंत, तर चांदी जीएसटीसह प्रतीकिलो ९८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. परिणामी लग्नसराईसाठी सोने खरेदीच्या बेतात असलेल्या नागरिकांना सोन्याच्या चढ्या दराचा सामना करावा लागत आहे.
सोनं पुन्हा महागणार?
ग्राहक जरी असले, तरी ते सोने घेताना रोष व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र, काही ग्राहक भाव वाढत्याने सोने मोड करतानाही दिसत आहेत. अमेरिका व चीन यांच्यात काही तडजोड झाली तर भाव कमी होण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा सोने दर एप्रिलअखेर 1,36,000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.