गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मागील एका आठवड्यात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने उचांक पातळी गाठली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्यामध्ये 900 रुपये आणि चांदी मध्ये 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव 93 हजार रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीचा दर 1 लाख 5 हजारांवर पोहचला आहे.
दरम्यान, 2024 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दर हे 66 हजार रुपये होते. एकाच वर्षात सोन्याचे दरात तब्बल 25 ते 30 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा आणि चांगला परतावा मिळाला आहे. रशिया युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अस्थिरता, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय अशा वेगवेगळ्या गोष्टींचा सोन्या-चांदीच्या दारावर परिणाम झाला असून दरात वाढ झाली असल्याच सुवर्ण व्यवसायिक यांचे म्हणणे आहे