जगातील झालेल्या बाजारातील उलाढालीचा परिणाम हा सोने चांदीच्या किमतीवर दिसून येतो. जुलै महिन्यात सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहिला मिळाले आहे. त्यानंतर दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली.आता सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या भावात वाढ झाल्याची दिसून येत असली तरी चांदीची चमक हि कमीच आहे.
गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याने ६०० रुपयांची उसळी घेतली होती. तर सप्टेंबर महिन्यातही सोन्याच्या भावात वाढ होण्याचे सत्र सुरु आहे. १ सप्टेंबरला भाव घसरले. तर २ सप्टेंबरला १५० रुपयांची वाढ झाली. ३ तारखेला भावात बदल झाला नाही.
४ सप्टेंबर रोजी भाव १०० रुपयांनी वधारले. २२ कॅरेट सोने ५५,४५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,४०० रुपये प्रति १० ग्रॅम असा होता.
सप्टेंबर महिन्यात चांदी चा भाव हा कमीच राहिला . १ सप्टेंबर रोजी चांदीत ५०० रुपयांची तर २ सप्टेंबर रोजी चांदीत २०० रुपयांची घसरण झाली. ४ सप्टेंबर रोजी चांदीत किलोमागे ७०० रुपयांची घसरण झाली.