गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदी दरात मोठी चढ-उतार पहायला मिळत आहे. गत आठवड्यात सोने दारात घसरण झाली होती. यामुळे ७६ हजारापुढे गेलेला सोन्याचा दर घसरणीमुळे ७५ हजारावर आले होते. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र विजयादशमीच्या पूर्वसंध्येलाच शुक्रवारी सोने दरात तब्बल १२०० रुपयाची वाढ झाली. तर दुसरीकडे चांदी दरात २००० रुपयाची वाढ झाल्याने दसऱ्याला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांच्या खिश्याला चांगलीच कात्री बसली आहे.
दसऱ्याला सोने १२०० रुपयाने तर चांदी २००० रुपयांनी वाढली, यानंतर सोने दरात पुन्हा वाढ झाली. तर दुसरीकडे चांदी दर स्थिर आहे. शनिवारी सोने दरात प्रति तोळा ४०० रुपयाची वाढ झाली. आता दिवाळीपर्यंत सोन्याचा दर ८० हजारापर्यंत जाणार असल्याचा अंदाज पूर्ण वर्तविला जात आहे. आज रविवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ७६४०० रुपये प्रति तोळा इतका झाला. चांदीचा एक किलोचा दर ९२००० रुपये इतका आहे.