जळगाव । मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसून आली. यामुळे सोन्याचा भाव पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठणार की काय? असं वाटत होते. मकर संक्रांतीपूर्वी देखील सोन्याचा भाव वाढला होता मात्र संक्रांतीनंतर आता जळगाव सराफ बाजारात सोने दरात घसरण झालीय. सोबतच चांदीचा दर देखील घसरला आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर ‘त्या’ प्रकरणाचा उलगडा
मकर संक्रांतीपूर्वी जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढले होते. सोने जीएसटीसह 81,164 रुपये प्रति तोळ्यावर, तर चांदी 92 हजार रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली होती. मात्र, मकर संक्रांती सण संपताच ही महागाईची पतंग जमिनीवर आली.
जळगाव सराफ बाजारात शनिवारी 91 हजार 300 रुपये प्रति किलोग्राम असलेली चांदी मंगळवारी 1800 रुपयांची घसरण होऊन 89 हजार 500 रुपये प्रति किलोग्रामवर आली. याच काळात, शनिवारी 78 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर असलेल्या सोन्याच्या भावात सोमवारी 200 रुपयांची वाढ झाली होती, मात्र नंतर त्यात 300 रुपयांची घसरण होऊन ते 78 हजार 500 रुपये प्रति तोळ्यावर आले.
ग्राहकांना दिलासा
सोने आणि चांदीच्या भावात ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. सणाच्या काळात महागाईने ग्राहक राजाला घाम फुटला होता, मात्र आता त्यांना या धातू स्वस्त मिळू लागल्या आहेत. सराफा व्यवसायिकांचे म्हणणे आहे की ही घसरण ग्राहकांसाठी गुंतवणुकीची चांगली संधी आहे.