Gold Silver Rate Today 3 October 2024 । आजपासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत असून, या पार्श्वभूमीवर सराफा बाजारामध्ये तेजी पहायला मिळत आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सवात सोने प्रति तोळ्याचे दर ८० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारने आपल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (बजेट) सोन्यावरील आयात शुल्क कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. ज्यानंतर सोन्याचा दर उच्चांकावरून प्रचंड घसरुन स्वस्त झाले. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील गेल्या काही दिवसात सोने दराने नवीन भरारी घेतली आहे.
गेल्या आठवड्यात सोने १५०० रुपयांनी महागले होते. ३० सप्टेंबर रोजी सोने १६० रुपयांनी उतरले होते. तर १ ऑगस्ट रोजी त्यात ३३० रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. तर २ ऑक्टोबर रोजी सोन्याने ५४० रुपयांची मुसंडी मारली.
आजही सकाळच्या सत्रात मौल्यवान धातुत वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७१,१५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७६०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
१४ ते २४ कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७५,५१५, २३ कॅरेट ७५,२१३, २२ कॅरेट सोने ६९,१७२ रुपयांवर, तर १८ कॅरेट आता ५६,६३६ रुपये, १४ कॅरेट सोने ४४,१७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८९,८८२ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
जळगावच्या सुवर्णपेठेत आज गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६, १०० रुपये प्रति तोळा इतका आहे. जीएसटीसह सोने ७८, ३१० रूपपर्यंत आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ६९, ३१० रुपये इतका आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवात सोने प्रति तोळ्याचे दर ८० हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
यामुळे आता सणासुदीच्या दिवसात ग्राहकांच्या खिशाला जोरदार कात्री बसणार आहे. सणासुदीसोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सराफा बाजारात दिवसागणीक सोन्याच्या किंमती नवनवीन उच्चांकच गाठणार आहे.