तुम्हाला सोने खरेदी करायचे आहे का? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास

सोने-चांदी : जागतिक बाजारातील उलाढालींचा परिणाम हा सोन्याच्या व चांदीच्या किमतीवरती होतो.सोन्याच्या  व चांदीच्या दरात चढ उतार सुरूच असतात.आज मंगळवारी सराफ बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे.यामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर 59 हजाराच्या खाली आहे. मात्र दुसरीकडे आज चांदीच्या दरात वाढ झाली.

बाजार उघडताच सोन्याचा भाव 50 रुपयांनी घसरला. तर चांदीच्या दरात 170 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,184 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,110 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. वाढीनंतर चांदीचा भाव 72,030 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

जाजून घ्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर?
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर 0.07 टक्क्यांनी म्हणजेच 42 रुपयांच्या घसरणीसह 58,888 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​गेला. तर MCX वर चांदीची किंमत 0.23 टक्क्यांनी म्हणजेच 168 रुपयांच्या वाढीनंतर 72,110 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.