RITES जॉब्स 2024: RITES म्हणजे Rail India Technical and Economic Service Limited, जे भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक प्रमुख कंपनी आहे. RITES विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि प्रकल्प वस्थापनाच्या सेवांची पुरवठा करते.
RITES कंपनी रेल्वे, मेट्रो, रस्ते, विमानतळ आणि बंदरे यासारख्या क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प हाताळते. जर तुम्ही तंत्रज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रेल्वे क्षेत्रातील करियरच्या संधीं शोधात असाल, तर RITES मध्ये नोकरी मिळवण्याची हि संधी निश्चितच चांगली आहे. RITES मध्ये एकूण 223 पदांची भरती होणार आहे.
या पदांसाठी भरती
सर्वाधिक पदे पदवीधर शिकाऊ- 141
डिप्लोमा अप्रेंटिस- 36 पदे
ट्रेड अप्रेंटिस (ITI)- ४६ पदे
एकूण पदांची संख्या- 223
शैक्षणिक अट ?
तुम्ही अभियांत्रिकी पदवी (BE/B.Tech/B.Arch), डिप्लोमा किंवा नॉन-इंजिनीअरिंग, पदवी (BA/BBA/B.Com/B.Sc/BCA) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून केली असेल, तर लगेच उघडा. तुमचा संगणक, RITES rites.com च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करा.
या नोकरीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १४००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी १०,००० रुपये पगार मिळणार आहे.
अंतिम मुदत ?
25 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्या आधारावर निवड केली जाईल.
उमेदवार – rites.com अधिकृत वेबसाइट वर जाऊनअर्ज करू शकतात. सर्व आवश्यक तपशील आणि कागदपत्रे योग्यरित्या भरल्यानंतर तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी, कृपया अधिकृत सूचना वाचा.