जळगाव : दुपारी वडिलांसोबत जेवण केले व त्यानंतर खेळण्यासाठी गेलेल्या राधिका दीपक पावरा ही सात वर्षाची चिमुरडी पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार रोजी संध्याकाळी गांधी नगर भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार गांधी नगरात बांधकाम सुरु असून तिथे कुटुंबियांना सोबत राहणारे दीपक पावरा हे वॉचमन म्हूणन काम करतात,
त्यांना चार मुली असून रविवारी ते घरीच असताना, दुपारी त्यानी मुलीनं सोबत जेवण केले. त्यानंतर त्या खेळण्यासाठी गेल्या, त्यात राधिका ही सापडत नसल्याने त्यानी तिचा शोध सुरु केला. अखेर त्यांना ती पाण्याच्या टाकीत सापडली, तिला खाजगी रुग्णालयात नेले व डॉक्टररानी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळ्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हप्रमुख विष्णु भंगाळे तेथे पोहचले त्यांनी पावरा यांची सांत्वना केली. पवार यांनी मुलीवरती अंत्यसंस्कार गावी करतो असे सांगून चिमुरडी वरती अंत्यसंस्कार केले, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.