रेल्वे प्रवाशांना खुशखबर : मुंबई जाण्यासाठी धरणगावहून दररोज ट्रेन उपलब्ध

धरणगाव  :  मुंबई(दादर)जाण्यासाठी आता धरणगाव व अमळनेर वरून दररोज ट्रेन उपलब्ध आहे सायं. 6.50 वाजता जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
खान्देशातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता नवनिर्वाचित खासदार  स्मिता वाघ, तसेच धरणगाव व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती व  झेड आर यु सी सी , मेंबर प्रतिक जैन पश्चिम रेल्वे यांनी तमाम खान्देशातील जनता यांच्या मागणीला प्राधान्य देत  जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे व डी आर एम पश्चिम रेल्वे  यांना दादर भुसावळ ही गाडी कायमस्वरूपी मुदत वाढवून मिळावी यासाठी पत्राद्वारे निवेदन देण्यात आले होते. .
पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल भुसावळ  एक्सप्रेस ही गाडी जानेवारीत 9 महिने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती.  त्या गाडीला खानदेशातून  उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु सदरील गाडी 7 जानेवारीला 2023 सुरू झाली  व 1 सप्टेंबर 2024  पर्यंत धावली. आता सततच्या
 प्रयत्नांनी व पाठपुराव्याने दादर – भुसावळ एक्सप्रेस 30  डिसेंबर व 27 डिसेंबर 2024 पर्यंत  धावणार आहे.
खासदार स्मिता वाघ तसेच धरणगाव व अंमळनेर रेल्वे सल्लागार समिती व झेड आर यु सी सी मेंबर प्रतिक जैन, व खानदेशातील तमाम जनता  यांचेकडून   जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे व डी आर एम पश्चिम रेल्वे मुंबई यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
दादर -भुसावळ स्पेशल एक्सप्रेस (सोम,बुध,शनि)  30 डिसेंबर 2024 पर्यंत धावणार.
दादर भुसावल स्पेशल एक्सप्रेस (दर शुक्रवार) 27 डिसेंबर 2024 पर्यंत धावणार आहे.