मुंबई : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. यानुसार जुलै महिन्यात अर्ज केलेल्या १ कोटी ८ लाख पात्र महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. हे जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना ३१ ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भात राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा केली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेऊन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3 टक्के निधीपैकी 1 टक्के निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष 2024-25 साठी लागू असेल.
ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या ४५ ते ५० लाख महिलांना ३१ ऑगस्टला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं.