आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’; जाणून घ्या बातमी काय सांगतेय?

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । दिल्ली, मुंबई आणि कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर मिळाल्याची माहिती आहे. जेन स्ट्रीटकडून विद्यार्थ्यांना हे वार्षिक पॅकेज मिळालं आहे. ‘आज तक’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

मागच्या वर्षी सर्वात जास्त २.१६ कोटी रुपायंच्या पगाराची ऑफर ऊबरने आयआयटीच्या विद्यार्थ्यांना दिली होती. त्याशिवाय १ डिसेंबरला सुरु झालेल्या प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय नोकरीसाठी २.४ कोटी रुपये आणि भारतात १.३ कोटी रुपये वर्षिक पॅकेज मिळालं आहे.

पहिल्या दिवशी आयआयटी गुवाहाटी, रुडकी आणि मद्रासमध्ये एकूण ९७८ विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजची ऑफर मिळाली आहे. इंजिनिअरिंगच्या या तीन टॉप महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल जॉबच्या ऑफर मिळाल्या आहेत. IIT मद्रासचा प्लेसमेंट यावेळी मागच्या वर्षीपेक्षा १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.