मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी : आता.. मध्येही मिळणार दारू

तरुण भारत लाईव्ह । ३ जानेवारी २०२२ । मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता IT अन् ITES कंपनीमध्ये देखील दारू मिळणार आहे. आयटी पार्कमध्ये रेस्टॉरंट तसेच बार उघडण्यासाठी परवाना उपलब्ध होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीत या श्रेणीतील भूखंडांमध्ये बार सुरू करण्यासाठी एनओसी देण्याच्या तरतुदीला मान्यता दिली आहे.

आता या श्रेणीत येणाऱ्या कोणत्याही कंपनीला जिल्हा बार समितीमध्ये बार परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना प्राधिकरण आपली एनओसी देईल. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयटी आणि आयटीईएस सारख्या कंपन्या 24 तास काम करतात. परदेशात असलेल्या या कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये रेस्टॉरंटसह बारही सुरू आहेत. या श्रेणीतील नोएडा प्राधिकरणाने वाटप केलेल्या भूखंडांना अद्याप बार उघडण्याची परवानगी नव्हती.

यामुळे प्राधिकरणाला यासाठी एनओसीही देता आली नाही. एनओसीशिवाय जिल्हा बार समितीला या कंपन्यांमध्ये बार सुरू करण्यासाठी परवाने देता येत नव्हते. बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कार्यालयातील बारचा मार्ग मोकळा झाला आहे.