आनंदाची बातमी! राज्यात पाऊस पडणार, ‘या’ जिल्ह्याना यलो अलर्ट

तरुण भारत लाईव्ह । २ सप्टेंबर २०२३। देशात यावेळी मान्सून वर अल निनोचा प्रभाव दिसून येतोय. त्यामुळेच जून व ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला नाही. जुलै महिन्यात पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला होता. पण पावसाचे तिन्ही महिने संपून गेले तरी राज्यातील कुठलेच धरण भरले नाहीत. आता सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा होणार यावर यावेळची परिस्थिती अवलंबुन आहे. त्यात हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात आज तसेच उद्या यलो अलर्ट दिला आहे.

राज्यातील पावसासंदर्भात पुणे हवामान विभागाने माहिती दिली आहे त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, या जिल्ह्याना शनिवारी आणि रविवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात देखील लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्यात जर पाऊस चांगल्याप्रकारे  झाल्यास रब्बी हंगाम शेतकऱ्यांना घेता येईल  त्याचबरोबर धरणांमध्ये जलसाठा देखील होईल.