Google Pay वापरकर्त्यांना मोठा झटका, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Google Pay । आजकाल प्रत्येक जण ऑनलाईन पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. मागील काही वर्षांत डिजिटल पेमेंटच्या सुविधेमुळे दैनंदिन व्यवहार सोपे झाले आहेत. मोबाईल रिचार्जपासून ते वीज बील भरण्यापर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार PhonePe, Google Pay सारख्या UPI अ‍ॅप्सद्वारे सहज करता येतात. मात्र, आता Google Pay वापरकर्त्यांना एक मोठा धक्का बसणार आहे, कारण Google ने काही सेवांसाठी सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही बिल पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करत असाल, तर तुम्हाला 0.5% ते 1% पर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. याशिवाय, या शुल्कावर जीएसटीदेखील लागू होणार आहे. आतापर्यंत Google Pay वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते, मात्र आता कंपनीनेही इतर फिनटेक कंपन्यांप्रमाणे सुविधा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

अहवालानुसार, Google Pay ने वर्षभरापूर्वीच काही ऑनलाईन बिल पेमेंटवर 3 रुपये सुविधा शुल्क लागू केले होते. तसेच, जर वापरकर्त्याने वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले, तर 15 रुपये प्रक्रिया शुल्क लागू करण्यात आले. हे शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी लागू असून, त्यामध्ये जीएसटी समाविष्ट आहे.

Google Pay द्वारे UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू करण्यात आले आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, ग्लोबल सर्विस फर्म PwC च्या अहवालानुसार, स्टेकहोल्डर्सना UPI व्यवहारांची प्रक्रिया करण्यासाठी 0.25% खर्च करावा लागतो. त्यामुळे हे खर्च भागवण्यासाठी फिनटेक कंपन्या नवीन महसूल मॉडेल्सचा अवलंब करत आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एक गर्भवती, दुसरीची प्रसूती

सरकारचा काय निर्णय असेल?

सध्या UPI व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत, मात्र काहीवेळा UPI व्यवहारांवर शुल्क लावण्याची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत सरकारने UPI व्यवहार मोफत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र भविष्यात यात काही बदल होऊ शकतात.

ग्राहकांनी काय करावे?

बिल पेमेंट करण्यापूर्वी शुल्क तपासा

डिजिटल पेमेंटसाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सच्या शुल्क धोरणांची तुलना करा

यूपीआय किंवा इतर मोफत पर्यायांचा विचार करा

Google Pay सारख्या फिनटेक कंपन्या विविध शुल्क आकारण्यास सुरुवात करत असल्याने, ग्राहकांनी सावध राहून त्यांच्या व्यवहारांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. भविष्यात UPI व्यवहारांवरही शुल्क लागू होऊ शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.