---Advertisement---
---Advertisement---
केंद्र सरकारने ALTT, ULLU, Desiflix, BigShots सारख्या २५ OTT ॲप्सवर बंदी घातली आहे. या ॲप्सवर वापरकर्त्यांना अश्लील आणि बोल्ड कंटेंट दाखवल्याचा आरोप आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) भारतात या वेबसाइट्स आणि ॲप्स तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारने ज्या OTT ॲप्स आणि त्यांच्या वेबसाइट्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बेकायदेशीर, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट दाखवले जात होते. सरकारने या २५ ॲप्स आणि OTT प्लॅटफॉर्मवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.
या OTT ॲप्सवर बंदी
- ALTT
- ULLU
- Big Shots App
- Desiflix
- Boomex
- Navarasa Lite
- Gulab App
- Kangan App
- Bull App
- Jalva App
- Entertainment
- Look Entertainment
- Hit Prime
- Feneo
- ShowX
- Sol Talkies
- Adda TV
- HotX VIP
- Hulchal App
- MoodX
- NeonX VIP
- ShowHit
- Fugi
- Mojflix
- Triflicks
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० आणि आयटी नियम, २०२१ (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) अंतर्गत या OTT ॲप्स आणि वेबसाइट्सवर कारवाई केली आहे. यापैकी अनेक अॅप्स आणि वेबसाइट्स सरकारने ठरवून दिलेल्या कंटेंट सर्टिफिकेशनला बायपास करत होत्या आणि आयटी कायदा, २०२१ च्या नियमांचे उल्लंघन करत होत्या.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) संबंधित एजन्सींना या अॅप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. या प्लॅटफॉर्मवरून अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट सतत प्रसारित केला जात होता.