नागपू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शासकीय कर्मचाऱ्यांची केलेली मनधरणी अपयशी ठरलीय. सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. शासकीय कर्मचारी हे उद्या सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. विधानसभेत सरकारने निवेदन केल्यानंतरच संघाबाबत निर्णय होणार आहेत
आज मुख्यमंत्री आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आजच्या बैठकीत सरकारने १० नोव्हेंबर २००५ च्या पूर्वीचा सरसकट पेन्शन च प्रस्ताव दिला आहे. मात्र तो मंजूर नसल्याने उद्या संपावर जाणार आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सामन्य नागरिकांना बसणार आहे.
आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी कर्मचाऱ्यांना ग्वाही दिली की, सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यास सकारात्मक आहे. शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. आपले आर्थिक आणि सामाजिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मागेच्या वेळी जे आश्वसन दिले आजही माझे तेच शब्द आहेत. गेल्यावेळी आपण सहकार्य केले, तसेच आताही करा. संपाची हाक न देता सहकार्याची भूमिका घेण्याची गरज होती, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.