तीन-चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशसह अन्य राज्यात महिला भगिनींसाठी लाडली बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै २०२४ नंतर ही योजना लागू करीत १५०० रुपयांप्रमाणे प्रती महिना, असा सुमारे १० लाख महिलांना लाभ दिला जात आहे. मात्र, सर्वसामान्य महिला भगिनींसह अन्य तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय सेवेत असलेल्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याचे शासनाकडे आलेल्या तक्रारींवरून दिसून आले आहे.
सरकारी कर्मचारी महिलांची पडताळणी
महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. निवडणुकीपूर्वी सरसकट १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वच महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. यासोबतच शासकीय कर्मचारी महिलांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची तक्रार करण्यात आली. यात सुमारे दीड लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी महिलांची पडताळणी केली असता जिल्ह्यासह राज्यातून सुमारे दोन हजारांहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे चौकशीदरम्यान दिसून आले. या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिला लाभार्थीकडून राज्य सरकार वसुली करणार असल्याची चर्चा आहे.
महिलांसोबत पुरुषांनीदेखील घेतला लाभ
या योजनेतील अटी-शर्तीनुसार महिलांच्या अर्जाची छाननी काही महिन्यांपासून सुरू आहे. यात अनेक गैरप्रकार या योजनेतून समोर आले असून महिलांसोबत पुरुषांनीदेखील बनावट खात्यांच्या आधारे या योजनेचा लाभ घेतल्याचे प्रकार समोर आले होते.
नाशिक विभागात दीड लाखाहून अधिक दुहेरी लाभार्थी
नाशिक विभागातून नाशिक ३४ हजार ५८८, जळगाव ४० हजार ७७७, धुळे १३ हजार ९०, नंदुरबार ७ हजार ८०८ तर अहिल्यानगर ५० हजार ६१७ अशा महिला ताभार्थीनी दोन योजनांसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.
करपात्र शेतकऱ्यांप्रमाणे पावणे आठ लाख महिलांचा लाभ बंद
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेंतर्गत करपात्र उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांकडून लाभ परतावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याच प्रमाणे पडताळणीअंती लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना, अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या ७ लाख ७० हजार महिलांचा हप्ता फेब्रुवारीपासून बंद करण्यात आला आहे.
नियमबाह्य घेतला लाभ
सरकारी कर्मचान्यांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे असतानाही वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिलांनी याचा ताभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारी नोकरदार महिलांसह दुहेरी वा अन्य योजनांचे लाभ घेतलेल्या महिलांची संख्या ४० हजारांहून अधिक असून मुंबई मुख्य कार्यालय स्तरावरून पडताळणी करण्यात आली असल्याचे जिल्हा कार्यालय अधिकारी स्तरावरून सांगण्यात आले.
नोकरदार महिलांसह अन्य महिला दोन योजनांच्या लाभार्थी
राज्यातील दोन हजार ६५२ ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील सरकारी नोकरदार महिला तसेच पीएम किसानसह अन्य योजना अशा दोन योजनांचा सुमारे एक लाख २० हजार महिलांनी लाभ घेतत्याची आकडेवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या तपासणीअंती समोर आली आहे. अजून सहा लाख सरकारी कर्मचारी लाभार्थीची लाडकी बहीण योजनेत पडताळणी होणार आहे.
दुहेरी लाभ घेतलेल्या लाभार्थीची होणार चौकशी
राज्य सरकाख्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञान विभागाला सव्वा लाख सरकारी कर्मचाऱ्यांची तांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील यूआयडी विशिष्ट क्रमांकाच्या चौकशीनंतर २ हजार ६५२ महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे.