जळगाव : राज्यात तसेच जळगाव जिल्ह्यात सद्यः स्थितीत तापमान ४० ते ४४ अंशांदरम्यान असून, एप्रिल ते मेदरम्यान सुमारे ४८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा संभव लक्षात घेता, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन विभागाने उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी जिल्हा स्तरावरून संबंधित प्रशासकीय विभाग, महापालिका, नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी उपाययोजनांची अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत.
वीज देयकांवर उष्णता लहरीशी संबंधित सामग्री प्रसारित करावी आणि उष्णतेची लाट असलेल्या दिवशी मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये यांसह नागरिकांनी थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना डोके झाकून ठेवा, छत्री, टोपी, टॉवेल इतर साधनांचा वापर, पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत. घराबाहेरील कामे सकाळी आणि सायंकाळी मर्यादित करावीत. दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उष्णतेच्या लाटांमध्ये वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वीज देयकांवर उष्णता लहरीशी संबंधित सामग्री प्रसारित करावी किंवा वीज देयकांसह संबंधित माहितीपत्रक वितरित करावे, अशा सूचना ऊर्जा विभागास देण्यात आल्या आहेत.
पोलिसांसाठी सिग्नलवर निवारा, बूध उभारणी, प्रथमोपचार किट उपलब्ध करावे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उष्माघात प्रथमोपचार, प्रशिक्षण द्यावे. दुपारी ओपन टू स्काय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये. उष्णतेची लाट असलेल्या दिवशी मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशा सूचना पोलीस
प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
बसस्थानकातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत राहण्यासह प्रतीक्षा कक्षावर सावली पाणी आणि पंखे यांची सोय करावी. वाहनांवर खबरदारीचे उपाय दाखवा, प्रवाशांसाठी माहितीपत्रक वितरित करावे दुरचित्रफीत, प्रसारित करण्यासाठी सार्वजनिक संबोधन प्रणाली, बसमध्ये प्रथमोपचार किट मुबलक साठा असल्याची खात्री करावी. उद्योगाच्या नियोजन आरखड्यात आपत्कालीन योजनेमध्ये उष्मा लहरी सज्जतेचा समाविष्ट करावा, ओद्योगिक क्षेत्रात वेळोवेळी आगीच्या घटना घडतात. त्यामुळे पुरेशा सुविधांसह पाण्याचा साठा तसेच फोम टेंडरची सुविधा ठेवावी.
आरोग्य विभाग : उष्णतेच्या लाटेशी संबंधित आजार निरीक्षण आणि अहवाल तयार करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. आरोग्य केंद्रात उष्माघात रुग्णांसाठी स्वतंत्र वैद्यकीय वॉर्डाची व्यवस्था, जलद प्रतिसाद पथक तयार करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक रुग्णालयांमध्ये ओआरएस पावडरसह आवश्यक वैद्यकीय सुविधांचा साठा पुरेशा ठेवावा. आशा वर्कर्स यांना उष्माघात रुग्णांचे उपचार, तपशील संकलनाच्या सूचनांसह माहिती तालुका आरोग्य आधिकाऱ्यांकडे पाठवावी, सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः दुपारी रुग्णवाहिका तत्पर ठेवावी. उष्माघात प्रकरणे, मृत्यूचे दैनंदिन अहवाल करावेत.
प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभाग : शाळा, महाविद्यालयांचा वेळांचे नियोजन करावे. प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसह शाळेच्या वेळेत बदत करून परिस्थितीनुसार सुट्ट्यांचे नियोजन, मैदानी, शारीरिक हालचाली खेळ टाळावेत. मैदानात वर्ग घेऊ नयेत. दुपारच्या सत्रात मैदानी खेळांचे नियोजन टाळावे. विद्यार्थ्यांना उष्णतेव्या लाटेच्या बचावासाठी शिक्षित करा आणि आपत्कालीन सेवांचा संपर्क द्या. सकाळ सत्रातच परीक्षा घ्याव्यात. पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी. माध्यान्ह भोजन योजनेतर्गत मुलांना सरबत, ताक पॅकेट द्यावे.
कामगार विभाग : कामगारांचे कामाच्या तासांचे नियोजन आणि कामाच्या ठिकाणी सावली आणि थंड पाणी उपलब्ध करावे. उष्म घात प्रथमोपचार प्रशिक्षण द्यावे.
वन विभाग : क्न्यप्राणी, पक्ष्यांसाठी पुरेसे वृक्षारोपण, पाण्याचा पुरवठा असावा, आग रोखण्यासाठी वनक्षेत्रांचे निरीक्षण, प्रतिबंधात्म क उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : ग्रामीण भागात कूपनलिका, तलावांची दुरुस्ती, उन्हाळी हंगामापूर्वी जलस्रोतांची तपासणी करावी. सकाळी किंवा सायंकाळी पाणीपुरवठ्याच्या वेळेचे नियोजन करावे, विशेषतः सार्वजनिक पाण्याच्या वापरासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर सूचना द्याव्यात.
सार्वजनिक बांधकाम विभाग : सरकारी इमारती आणि संस्थांमध्ये कूल रूफ पेंटच्या वापराबद्दल प्रचार करावा. बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी निवारा आणि प्रथमोपचार किट उपलब्ध करावे.
कृषी विभाग : उष्णतेमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हवामानाची माहिती प्रसारित करण्यासाठी ‘शेतकरी मित्र’ यांचा वापर करावा, शेत तलावांच्या देखभालीसाठी किंवा निर्मितीला प्रोत्साहन, शेती आधारित उपजीविकेसाठी पाण्याची उपलब्धतेसंदर्भात नियोजन करावे.
महिला व बालविकास विभाग : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांसाठी उष्म धात प्रथमोपचार, प्रशिक्षणे घ्यावीत. सरबत, ताक पॅकेट मुलांना आणि गरोदर आणि स्तनदा महिलांना द्यावे. ग्रामपंचायत स्तरावर उष्णतेच्या लाटेबाबत आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांद्वारे जागरूकता निर्माण करावी.
पशुधन विभाग : उष्णतेच्या लाटेत स्थानिक नागरिकांना प्राण्यांची काळजी, फलक, माहितीपत्रके, प्राणी संरक्षण आणि पशुवैद्यकीय औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. पशुधन क्षेत्रात हिरवा चारा आणि थंड पाण्याची, निचाऱ्याची उपलध्दता करावी.
उद्याने दुपारी १२ ते ते दुपारी ४ दरम्यान खुली ठेवा
महापालिका, नगरपरिषदांनी बाजार, प्रमुख कार्यातये, बसस्थानक टॅक्सी, रिक्षायांबे आदी सार्वजनिक ठिकाणी सावली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पंखे. कूलर आदी नादुरुस्त असल्यास दुरुस्त करावेत. सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी संबंधित फलक लावावेत शॉपिंग मॉल्स, सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेठ्या व त्यांच्या वापरांसंदर्भात सूचना, मार्गदर्शन करावे. उद्याने दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत खुली ठेवावीत.
जिल्हा आपत्ती लाट आराखडा, मानक कार्यप्रणाली आणि घटना प्रतिसाद प्रणाली विकसित करावी. जिल्हा स्तरावर उष्मालाट नोडल अधिकारी नियुक्त करावा. अतिउष्णतेच्या लाटेसाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम सामाजिक म ध्यमातून प्रसारित करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा
अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती, जळगाव