महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अंतर्गत अहमदनगर व नाशिक जिल्ह्यासाठी भरती निघाली आहे. एकूण 70 रिक्त पदांसाठी हि भरती प्रक्रिया होणार आहे . या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2025 आहे.
या पदांसाठी भरती
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ : 41 जागा
अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ : 13 जागा
कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ : 16 जागा
हेही वाचा : संतापजनक ! बापाचं चार महिन्यांच्या मुलीसोबत हृदय पिळवटून टाकणार कृत्य
शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ – बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग), बी.टेक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअरिंग)
अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा)
कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला आणि वाणिज्य विषयातील पदवीधर उमेदवार (१०+२+३ पॅटर्ननुसार). कला आणि वाणिज्य विषयातील पदवीधर उमेदवारांनी MS CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
किती असेल पगार ?
अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ / कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ : रु. 9,000/- अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ : रु. 8,000/-
कसा कराल अर्ज?
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडची अधिकृत वेबसाईट https://www.mahadiscom.in उघडा.
वेबसाईटवर “करिअर” किंवा “नोकरी” या विभागात जाऊन, संबंधित भरतीची नोटिफिकेशन शोधा.
नोटिफिकेशन वाचल्यानंतर “ऑनलाइन अर्ज करा” किंवा “Apply Online” या लिंकवर क्लिक करा.
जर तुमच्याकडे आधीच खाते नसेल, तर “नवीन खाते तयार करा” (New Registration) वर क्लिक करा. आपली वैयक्तिक माहिती, ईमेल आयडी आणि पासवर्ड सेट करा.
अर्ज फॉर्ममध्ये तुमची शैक्षणिक माहिती, वयोमर्यादा, पत्ता, इत्यादी माहिती भरा.
हेही वाचा : दुर्दैवी ! वसतिगृहाच्या खोलीत विद्यार्थिनीने केलं असं काही, दरवाजा उघडल्यानंतर सर्वच थक्क
अर्ज प्रक्रिये दरम्यान आवश्यक कागदपत्रे (जसे की शैक्षणिक प्रमाणपत्र, छायाचित्र, ओळख पत्र, इ.) अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे भरा. पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट रसीद मिळेल.
सर्व माहिती तपासल्यानंतर, “सबमिट” किंवा “Submit” बटणावर क्लिक करा.
अर्ज सादर झाल्यावर, अर्जाची एक PDF कॉपी डाउनलोड करा किंवा प्रिंट घेऊन ठेवा. भविष्यात संदर्भासाठी ते महत्त्वाचे ठरेल.