जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले.
याप्रसंगी खा. स्मिता वाघ, आ. चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगर पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही स्वागत केले.
विमानतळावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.
दरम्यान, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे दोन दिवशीय जळगाव दौऱ्यावर आले आहेत. ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटणार आहेत. राज्यपाल राधाकृष्णन हे यांच्या नियुक्तीनंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.