तरुण भारत लाईव्ह न्यूज : जिल्ह्यात दूध संघासह ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आलेली जिल्हा दूध संघ संचालकांची निवडणूक 10 डिसेंबर रोजी मतदान प्रकिया पूर्ववत घेण्यात येणार आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून दाखल नामांकन अर्जांची सोमवारी छाननी, तर बुधवार, 7 डिसेंबर रोजी माघार असून, माघारीनंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये चुरस राहणार असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपुष्टात आलेल्या व येत असलेल्या 140 ग्रामपंचायतीतंर्गत सार्वत्रिक निवडणूक प्रकिया राबविली जात आहे. 140 ग्रामपंचायतीच्या 454 प्रभांगांतर्गत 140 सरपंच आणि 1216 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यावेळी सर्वसामान्य जनतेतून सरपंच निवड प्रकिया असल्याने निवडणूक लढविणार्या इच्छुकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आतापर्यत 671 इच्छुकांनी सरपंच तर 3274 जणांनी सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
जळगाव तालुक्यात 12 ग्रामपंचायतीच्या 36 प्रभागांसाठी 92 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यात देऊळवाडे, जळके, सावखेडा खुर्द, सुजदे, वराड बुद्रूक, वसंतवाडी, कुवारखेडे, भादली खुर्द, किनोद, विदगाव, घार्डी आणि भोलाणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणार्या 140 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची दाखल करण्याची मुदत शुक्रवारी सायंकाळी 5.30 पर्यंत होती. त्यादरम्यान सदस्यपदासाठी 3274 तर सरपंचपदासाठी 671 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी सोमवार 5 डिसेंबर, तर 7 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार होणार आहे. माघारीनंतर रविवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. तर मंगळवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून स्थानिक तहसिल कार्यालय वा नियोजीत ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.
अशी आहे ग्रामपंचायतनिहाय स्थिती
ग्रा. पं. प्रभाग सदस्य आलेले अर्ज सरपंच सदस्य
जळगाव 12 36 92 52 218
जामनेर 12 36 108 65 349
धरणगाव 7 21 51 24 99
एरंडोल 6 18 48 25 143
पारोळा 9 27 69 34 141
भुसावळ 6 20 56 31 144
मुक्ताईनगर 2 10 28 20 143
बोदवड 5 15 37 22 71
यावल 8 29 78 41 223
रावेर 22 74 200 81 446
अमळनेर 24 75 186 115 446
चोपडा 5 15 41 30 144
भडगाव 6 22 60 34 208
चाळीसगाव 16 56 154 97 499
एकूण 140 454 1208 671 3274