तरुण भारत लाईव्ह न्युज- जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ अंतर्गत मुदत संपुष्टात येत असलेल्या दुसर्या टप्प्यातील १४० ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना ९ नोंव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार २८ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रकिया अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात १४० ग्रा.पं मधील २१६९ उमेदवारांचा निवडणूक प्रचार रणधुमाळी आज शुकवारी सायंकाळी ५ वाजेनंतर थांबणार असून रविवार १८ रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. मतदान प्रकियेसाठी शनिवार दुपारी तालुकास्तरावरून मतदान साहित्य वाटप होऊन नियुक्त अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना केले जाणार असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.
ग्राम पंचायती १४० मतदान केंद्र ४७९ निवडणूक रिंगणात सदस्य- २१६९
निवडणूक रिंगणात सरपंच
बिनविरोध ग्रा.पं. १८ बॅलट युनिट ६५० निवडणूक रिंगणात सरपंच- ३७६
प्रभाग ४५४ कन्ट्रोल युनिट ५००
सदस्य १२०८ अधिकारी कर्मचारी १५००
सरपंच १४०
मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद : जिल्हा प्रशासन
जिल्ह्यातील १५ तालुक्यात १४० ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणुक आयोगातर्फे निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. यात १८ रोजी मतदान तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष निवडणुक असलेल्या ग्रा.पं. मतदानाच्या दिवशी निवडणुक मतदान शांततेत पार पाडाव्यात तसेच त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायत निवडणूक अधिसूचना प्रसिद्धीनंतर २८ नोव्हेंबरपासून सदस्य पदासाठी ३२४० तर सरपंच पदासाठी ६६२ उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यात छाननीअंती ३१९२ सदस्य तर ६५५ सरपंच पदाचे अर्ज वैध होते. ७ डिसेंबर मुदतीअखेर १०१३ सदस्य तर २७९ सरपंच उमेदवारांनी माघार घेतली. माघारीनंतर सदस्यपदासाठी २१७९ तर सरपंचपदासाठी ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
पहिल्या टप्प्यात सदस्यांमधून झाली सरपंच निवड
जिल्ह्यात महसूली गावांसह लोकसंख्येच्या प्रमाणानुसार १५१३ ग्रामपंचायती आहेत. कोरोना संसर्ग निर्बंधामुळे मार्च २०२० मध्ये सदस्य सरपंचपदाचा कार्यकाळाची मुदत संपुष्टात आलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांना सहा महिने स्थगीती देण्यात येवून मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार संसर्ग प्रादूर्भाव कमी होताच डिसेंबर २०२० मध्ये पहिल्या टप्प्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर होऊन १५ जानेवारी २०२१ ला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी घेण्यात आल
दुसर्या टप्प्यात लोकनियुक्त सरपंचाची धूम
ग्रामपंचायत निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात शासननिर्णय निर्देशानुसार डिसेंबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सर्वसामान्यांनी निवडून दिलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड करण्यात आली होती. मात्र, यावेळी मात्र जून २०२२ अखेर राज्यात सत्तातरानंतर शासन निर्णय आणि निर्देशानुसार दुसर्या टप्प्यात होणार्या १४० ग्रा.पं.निवडणूकांदरम्यान सर्वसामान्य जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.
सर्वात जास्त ग्रा.पं. अमळनेर आणि रावेर तालुक्यात
जिल्हयात दुसर्या टप्प्यात होणार्या १४० ग्रामपंचायतीपैकी १८ ग्रा.पं.तीत सदस्य सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १२२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक मतदान प्रक्रिया १८ डिसेंबर रोजी होत आहे. दरम्यान सर्वात जास्त अमळनेर २० आणि रावेर तालुक्यात १८ ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे. अन्य तालुक्यात कमी प्रमाणात ग्रा.पं.त निवडणूक होत आहे.
सदस्यासाठी २१७९ तर सरपंचासाठी ३७६ उमेदवार रिंगणात
जिल्ह्यात १४० ग्रा.पं.क्षेत्रात ४५४ प्रभागात १२०८ सदस्य आणि १४० सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. १२०८ सदस्यांसाठी २१७९ उमेदवार तर १४० सरपंचदासाठी ३७६ उमेदवार नशिब अजमावत आहेत.
१५०० अधिकारी-कर्मचारी नियुक्त
निवडणूक होणार्या ग्रामपंचायतीसाठी रविवार १८ डिसेंबर रोजी होणार्या मतदान प्रकियेसाठी जिल्हा तसेच तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूक मतदानासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ४७९ मतदान केंद्र असून ६५० बॅलट युनिट इव्हीएम आणि ५०० कन्ट्रोल युनिटची तांत्रिक तपासणी करण्यात येवून सिलबंद करण्याची प्रकिया झाली आहे. निवडणूक प्रकियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष सहायक असे एकूण १५०० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
ग्राम पंचायती १४० मतदान केंद्र ४७९ निवडणूक रिंगणात सदस्य- २१६९
निवडणूक रिंगणात सरपंच
बिनविरोध ग्रा.पं. १८ बॅलट युनिट ६५० निवडणूक रिंगणात सरपंच- ३७६
प्रभाग ४५४ कन्ट्रोल युनिट ५००
सदस्य १२०८ अधिकारी कर्मचारी १५००
सरपंच १४०