---Advertisement---
जळगाव : भारतीय जनसंघाचे संस्थापक स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा मंडळ क्रमांक-४ च्या वतीने प्रतिमापूजन व माल्यार्पणाचे करून अभिवादन करण्यात आले. हा अभिवादन कार्यक्रम आमदार सुरेश भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे अध्यक्ष मनोज काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ-४ चे “एक पेड मा के नाम” संकल्पनेतून वृक्ष वाटप व आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी माजी महापौर सीमा भोळे, लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, प्रदेश सचिव रेखा वर्मा, नगरसेविका दीपमाला काळे, सुचिता हाडा, दीप्ती चिरमाडे, अमित काळे, धीरज वर्मा, मंडळाचे चेतन तिवारी, ऋषिकेश शिंपी, ललित लोकचंदानी, सागर पोळ, अविनाश भोळे, अर्चना, नंदिनी राणा व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.