---Advertisement---

Pachora News : लोहारा येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

by team
---Advertisement---

पाचोरा : तालुक्यातील लोहारा येथिल पाचोरा रस्त्यावरील ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २७ मध्ये दहा गुंठ्यांत मा. नामदार गिरीष महाजन यांच्या प्रयत्नातून, सुसज्य असे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. 

लाहोरा येथील प्रथमेश मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष नंदू सुर्वे, खजिनदार दत्तात्रय भोसांडे, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील यांनी  माजी सरपंच मालतीबाई पाटील व उपसरपंच कैलास चौधरी यांच्याकडे सामाजिक सभागृहा साठी जागेची करून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला.

गिरीश महाजन यांनी प्रशासकीय मान्यता मिळवून दिली व याच जागेवर श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर(दि . ६ )रोजी समाज बांधवांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. 

या वेळी समाज बांधवांकडून मंत्री गिरीष महाजन, भाजपा गट पालक सुहास पाटील, शरद सोनार, कैलास चौधरी, मालतीबाई पाटील व तत्कालीन ग्रामपंचायत सद्स्य यांचे आभार मानण्यात आले.

या प्रसंगी प्रथमेश मराठा समाजाचे अध्यक्ष प्रतापराव सुर्वे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय चौधरी, खजिनदार दत्तात्रय भोसांडे, सदस्य विनोद पाटील, जगन्नाथ हिरे, नरेंद्र पाटील, दीपक भोसंडे, गणेश बाविस्कर, श्रीराम शिंदे, कौतिक भोसांडे,पत्रकार महेंद्र शेळके,पत्रकार चंद्रकांत पाटील, पत्रकार कृष्णराव शेळके, म्हसासचे माजी सरपंच किसन पाटील, डिंगबर पाटील, नाना पवार, पुरुषोत्तम सुर्वे सर, सुनील शेळके, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, सुभाष बाविस्कर, रामधन शिंदे, संतोष पाटील, दीपक गोंधळे, बबलू डांबरे, श्रावण डांबरे, भरत पाटील, राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड राजू गोंधळे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन डांबरे व गावातील मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment