पालकमंत्री पदाच्या वादावर, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले…

नाशिक : निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडते. यंदाच्या वर्षी नाशिकच्या पालकमंत्री पदाला तात्पुरती स्थगिती असल्यानं महापूजेचा मान कुणाला मिळेल याबाबत चर्चा सुरू होती. शासकीय महापूजेला गिरीश महाजन हे पत्नीसह उपस्थित होते. स्थानिक आमदार हिरामण खोसकरही उपस्थित होते. नाशिकमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या शासकीय महापूजे वेळी गिरीश महाजन म्हणाले की, “मला दुसऱ्यांदा हा योग आला. काल मी अमित भाईं सोबत आलो. आज पुन्हा पूजेसाठी आलो. मी चौथ्यांदा पूजा करतोय. कुंभमेळा मंत्री म्हणून माझं नाव घोषित झालं आहे. सुरक्षित कुंभमेळा करू. तयारीला सुरुवात केली आहे” अंस गिरीश महाजन म्हणाले.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला तात्पुरती स्थगिती मिळेल असली तरी दादा भुसे यांच्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली होती. गिरीश महाजन यांना पालकमंत्री पदावरुन निर्माण झालेल्या पेचाबद्दल विचारण्यात आलं असता. त्यावर गिरीश महाजन म्हणाले की आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत पालकमंत्री पदाबाबत देवाला माहिती. ‘रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा करून प्रश्न सुटेल’ असही ते म्हणाले.