Gujarat accident : अपघातात पत्नीचा मृत्यू : पतीने स्वत: वर दाखल केला गुन्हा

Gujarat accident :  कार दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनामुळे दु:खी झालेल्या नवऱ्यानं पोलिस स्टेशनमध्ये स्वत:विरोधातच गुन्हा दाखल केला. परेश दोशी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. नर्मदा जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरु आहे

परेश दोशी यांनी पोलिसांना सांगितलं की, ते पत्नी अमितासोबत अंबाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यानंतर घरी येत असताना साबरकांडा येथे खेरोज-खेडब्रह्मा राज्य महामार्गावर दान महुदी गावांजवळ एक श्वान गाडीच्या समोर आला. त्यामुळे लक्ष विचलीत झालं. त्या श्वानाला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटलं. गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला आणि पोलला धडकली.

कारचा दरवाजा ऑटो लॉक झाला. त्यामुळे दोघेही गाडीतच अडकले. अपघात झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. काही जणांनी गाडीच्या दरवाजाची काच फोडून दोघांनाही बाहेर काढले

 

दोघांनाही रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. पण पत्नीचं निधन झालं. याप्रकरणी दोशी यांनी स्वत:वरच गुन्हा दाखल केलाय. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.