---Advertisement---

मोठी बातमी ! गुलाबराव देवकर अडचणीच्या भोवऱ्यात,१० कोटी कर्जप्रकरणी चौकशी सुरु

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक मोठ्या नेते,पदाधिकारी यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश घेतला आहे. या प्रवेशामुळे गुलाबराव देवकर चर्चेत आले आहे. अशात त्याच्या अडचणीही वाढल्याचे समोर आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या घटनेला २४तास उलटत नाही तोच देवकर चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.त्यानुसार गुलाबराव देवकर यांच्या संस्थेने घेतलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,गुलाबराव देवकर हे राजकीय तसेचह सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातही ते कार्यरत असून त्यांची श्रीकृष्ण शिक्षण संस्था आहे. या संस्थेने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे. तब्बल १० कोटी रुपयांचे हे कर्ज असल्याचे बोलले जात आहे.

या कर्जाबाबत चौकशी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आहे. आहे. गुलाबराव देवकर यांनी शिक्षण संस्थेच्या नावावर घेतलेले हे कर्ज बेकायदेशीर असल्याचा आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. तसेच याप्रकरणी चॊकशीची मागणी देखील त्यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर आज दि. ५मे रोजी जिल्हा बँकेवर सहकार विभागाच्या पथकाने धडक दिली. धुळे जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथील सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या पथकाने ही कारवाई सुरु केली आहे.


---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment