जळगावच्या विकासाला मिळणार गती, पालकमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची ‘हॅट्ट्रिक’

जळगाव ।  जिल्ह्यातील पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाकडे सोपविण्यात आले असून, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा हे पद भूषवण्याचा मान मिळवला आहे. यामुळे त्यांनी पालकमंत्री म्हणून हॅट्ट्रिक साधली आहे.

गुलाबराव पाटील हे शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे आणि आक्रमक नेते मानले जातात. जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, सहकार तसेच प्रशासनावर त्यांची ठोस पकड असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवाचा फायदा विविध विकासकामांना गती देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गुलाबराव पाटील यांना जलसंपत्ती आणि शेतकरीवर्गाशी संबंधित विषयांमध्ये विशेषतः अनुभव असून, त्यांनी यापूर्वीही जिल्ह्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प आणि शासकीय योजनांमध्ये प्रगती होईल, अशी नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे.

शिंदे गटाने जळगावमध्ये पालकमंत्रीपद राखून ठेवणे हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे