गुलाबराव पाटील यांचा देवकरांवर हल्लाबोल, म्हणाले “देवकर भ्रष्टाचारात बुडालेले”

#image_title

जळगाव : पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. “गुलाबराव देवकर ज्याही पक्षात जातील, त्याच पक्षावर शिंतोडे उडतील,” असे म्हणत त्यांनी देवकर यांच्या भ्रष्टाचाराच्या फेऱ्यांवर गंभीर आरोप लावले आहेत.

जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे देवकर यांनी परत केले नसल्याचा दावा करत, त्यांनी मजूर फेडरेशनच्या माध्यमातून मजुरांचे पैसे उचलून कर्ज घेतल्याचा आरोप केला. मजूर सोसायटीमध्ये सरकारी नोकर असल्याचे आणि त्यांच्याकडून आयटी रिटर्न भरूनही भ्रष्टाचाराचा डोंगर उभा राहिल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

“गुलाबराव देवकर हे साधू नाहीत, तर घरकुल घोटाळ्याच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत. त्यांच्या शिक्षेला मिळालेली स्थगिती रद्द करण्यासाठी मी न्यायालयात जाणार आहे. ज्या पक्षाला वाटत असेल त्यांनी देवकरांना पक्षात घेतले तरी मला काही हरकत नाही,” असे त्यांनी सांगितले.

“देवेंद्र फडणवीस नक्षत्र पाहून काम करणारे”

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यावर बोलताना, पाटील यांनी टीका करत म्हटले की, “फडणवीस नक्षत्र पाहून काम करणारे आहेत. राहू-केतू यांची पर्वा करून ते वेळेवर योग्य शिक्षा देतील.”

“कायद्याने पैसे मागणे हाच गुन्हा”

लाचलुचपत प्रकरणावर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “कायद्याने पैसे मागणे हाच गुन्हा आहे. सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे समाधान करावे. चांगला पगार असूनही लाच घेणारे वागणूक बदलतील, अशी आमची अपेक्षा आहे.”