---Advertisement---

सावधान! जळगावमध्ये ‘गुलेन बारे सिंड्रोम’चा शिरकाव, ४५ वर्षीय महिला बाधित

---Advertisement---

जळगाव : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गुलेन बारे सिंड्रोम (GBS) या गंभीर आजाराने थैमान घातले असून, आता या आजाराने जळगाव जिल्ह्यातही प्रवेश केला आहे. जळगाव तालुक्यातील एका ४५ वर्षीय महिलेला GBS झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्या सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे व पाठदुखी, तसेच अचानक चालण्यात व बसण्यात अडथळा जाणवत होता. त्यानंतर ३० जानेवारी रोजी संध्याकाळी कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

न्यूरॉलॉजिस्ट डॉ. गोपाल घोलप आणि डॉ. अभिजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. सुदैवाने, राज्यातील बहुतांश रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत नाही. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

हेही वाचा : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून अत्याचार; बाळाला दिला जन्म

GBS टाळण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजना

पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे.
उघड्यावरचे किंवा शिळे अन्न खाणे टाळावे.
हातापायांच्या स्नायूंमध्ये अचानक अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जीबीएस कसा होतो?

दूषित पाणी व अन्न सेवन केल्याने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होतो.
यामुळे अतिसार, ओटीपोटात वेदना आणि ताप येऊ शकतो.
संसर्ग झाल्यास १ ते ३ आठवड्यांत GBS चे निदान होऊ शकते.
डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या व्हायरल इन्फेक्शनमुळेही हा आजार होऊ शकतो.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment