बंगळुरू : कर्नाटकातील मंड्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहीत शिक्षकाने दोन महिन्यांआधी त्याच्या अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत पळून जाऊन तिचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थींनी वर्गातून परतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अभिषेक गौंडा नावाच्या शिक्षकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिस उपायुक्त लोकेश बी जे यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीला २३ नोव्हेंबर २०२४ रोजी अपहण करण्यात आले होते. त्यानंतर जेजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडितेला ५ जानेवारी रोजी मंड्या जिल्ह्यातील मलावल्ली तालुक्यातून तिच्या शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकाने तिचे अपहरण केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शिक्षक अभिषेक गौंडा हा एक विवाहीत असून त्याला दोन वर्षांचे मूलही आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अपहरण आणि बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे.