---Advertisement---

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुरु रंधावा गंभीर जखमी, जाणून घ्या नेमकं काय घडलं ?

by team
---Advertisement---

पंजाबी सिनेइंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता गुरु रंधावा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. ‘शौंकी सरदार’ या चित्रपटाच्या सेटवर एक स्टंट करताना हा अपघात झाला. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली.

काय घडले नेमके?

गुरु रंधावा सध्या आपल्या आगामी ‘शौंकी सरदार’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवर एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्याला मोठी दुखापत झाली. त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बेडवर झोपलेला असून, मानेला गंभीर दुखापत झाल्याने कॉलर लावण्यात आले आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून, डोक्यालाही जखम झाली आहे. तरीही तो कॅमेऱ्यात स्माईल करताना दिसतो.

गुरु रंधावाची भावना – “उत्साह मावळलेला नाही”

या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये गुरुने लिहिले,
“माझा पहिला स्टंट, माझी पहिली जखम, पण माझा उत्साह अजून मावळला नाही. ‘शौंकी सरदार’ चित्रपटाच्या सेटवरील एक आठवण. अ‍ॅक्शन हे खूप कठीण काम आहे, पण मी माझ्या प्रेक्षकांसाठी कठोर परिश्रम करेन.”

चाहत्यांची आणि सेलिब्रिटींची चिंता

गुरुची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर, अभिनेते अनुपम खेर यांनी कमेंट करत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. चाहत्यांनीही ‘लवकर बरे व्हा’ अशा शुभेच्छा देत त्याच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली.

‘शौंकी सरदार’ लवकरच प्रदर्शित होणार

गुरुचा ‘शौंकी सरदार’ हा चित्रपट १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय २०२४ मध्ये त्याचे अनेक संगीत केले आहेत. गुरु रंधावाच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना त्याचे चाहते आणि सहकलाकार करत आहेत. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष असून, लवकरच तो रिकव्हर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment