२४ लाखांचा गुटखा पकडला; कारवाईने प्रचंड खळबळ, चोपडा पोलिसांची मोठी कामगिरी

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने सुमारे २४ लाखांचा गुटखा पकडला. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांना गुप्त माहिती मिळाली की, आयशर गाडी भरून मोठ्या प्रमाणात केसरयुक्त विमल पान मसाला अर्थात विमल गुटख्याची तस्करी होणार आहे. त्यानुसार एसडीपीओ रावले यांनी आपल्या पथकासह म्हणजे, पो.नी. राहुल खताळ आणि पो.ना.चंदूलाल सोनावणे, रवी पाटील, नाना ठाकरे, पोकॉ प्रवीण पाटील, संदीप पाटील, शाम भिल, करीम सय्यद, मिलिंद सोनार, मिलिंद संदानशिव यांच्यासह  सापळा रचत रोटवद गावाजवळ दि. २३ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास आयशर गाडी अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यात तब्बल २३ लाख ५४ हजार ६०० रुपयाचा गुटखा मिळून आला. तर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राधेशाम संजय रघुवंशी (रा. पिंपळकोठा), असे सांगितले. तसेच गाडी मालक मनीष सैनी (रा. एरंडोल), असल्याची माहिती दिली. दरम्यान, या दोघांविरुद्ध पो ना. चंदूलाल सोनावणे यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

दरम्यान, अटकेतील संशयित आरोपी रघुवंशी याला धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्याचा चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे गाडी तथा गुटखा मालक मनीष सैनी याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियामध्ये प्रचंड उडाली आहे.