---Advertisement---

Video : ‘त्या’ नराधमाला फाशी द्या ; संतप्त समाज बांधवांची मागणी

by team
---Advertisement---

चोपडा : येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत हत्या केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त समाज बांधवांतर्फे मूक मोर्चा काढला.  यावेळी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्या अशी मागणी संतप्त समाज बांधवांनी केली.

चोपडा येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा या मागणीसाठी संतप्त समाज बांधवांतर्फे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी दुपारच्या सुमारास तेरा वर्षीय मुलगी शेतातून येत असताना संशयित आरोपी मुकेश बारेला याने अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी चोपडा आडगाव रस्त्यावर पोलिसांनी संशयित आरोपी हा फरार होत असताना ताब्यात घेतले असून पोक्सो अंतर्गत चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment