---Advertisement---

आनंदाची बातमी : देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन पुण्यात

by team

---Advertisement---

पुणे : पावसाचे दिवस आणि त्यात फिरणे हेय तर सगळयांनाच आवडते आणि त्यात हिल स्टेशन म्हटलं तर मग अजूनच खुप आनंद होतो.  पुणे शहराजवळील पश्चिम घाटामध्ये बांधलेले लवासा हे खाजगी हिल स्टेशन विकले गेले आहे. दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रकि‘या सुरू केल्यानंतर सुमारे 5 वर्षांनी, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) ने त्यास मान्यता दिली आहे. पुण्याच्या डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरने ते 1,814 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. एनसीएलटीने 25 पानांचा आदेश पारित केला आणि 1,814 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ही योजना मंजूर केली.

दिवाळखोरी संहिताअंतर्गत दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी  एनसीएलटीने ऑगस्ट 2018 मध्ये, एचसीसीची रिअल इस्टेट कंपनी लवासा कॉर्पोरेशनच्या कर्जदारांची याचिका स्वीकारली. लवासाला प्रमुख कर्ज देणार्‍यांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, एल अँड टी फायनान्स, आर्सिल, बँक ऑफ इंडिया आणि अ‍ॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. डार्विन प्लॅटफॉर्म‘इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही प्रामुख्यने  पायाभूत सुविधा आणि बांधकाम कंपनी आहे. हा डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपचा एक भाग आहे आणि त्याचा पाया 2010 मध्ये घातला गेला. ही कंपनी अनेक सेवांशी निगडीत आहे, ज्यात पायाभूत सुविधा, रिफायनरीज, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी यासार‘या क्षेत्रांचा समावेश आहे. लवासा विकत घेणार्‍या डार्विन समूहाने यापूर्वी जेट एअरवेज आणि रिलायन्स कॅपिटलच्या बोली प्रकि‘येत रस दाखवला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---